Maza Ladka Bhau Yojana Online Apply 2024

maza ladka bhau yojana
Maza Ladka Bhau Yojana Online Apply 2024- महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेद्वारे आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांना आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करेल. सरकारतर्फे देण्यात येणारे हे प्रशिक्षण युवकांना मोफत दिले जाणार आहे. याशिवाय तरुणांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची संक्षिप्त माहिती

उदिष्ट  :- Maza Ladka Bhau Yojana योजनेअंतर्गत उमेदवारांना उ‌द्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणा‌द्वारे रोजगारक्षम करणे.

आर्थिक तरतुद :-

• “मुख्यमंत्री युवा (Maza Ladka Bhau Yojana) योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.5500 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः-

• उ‌द्योजकांना त्यांच्या उ‌द्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणा‌द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. अंमलबजावणी संस्था : कौशल्य विकास, रोजगार व उ‌द्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य.

योजनेचे ठळक वैशिष्टे :-(Maza Ladka Bhau Yojana)

• बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उ‌द्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. • सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. • सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. • सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.

आस्थापना /उ‌द्योजकासाठी पात्रता

  • आस्थापना / उ‌द्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
  • आस्थापना उ‌द्योजकाने कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. व नाविन्यता विभागाच्याआस्थापना / उ‌द्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
  • आस्थापना / उ‌द्योगानी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उ‌द्योग आधारची नोंदणी केलेली असावी.

उमेदवारांची पात्रताः (Maza Ladka Bhau Yojana)

  • उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल 35 वर्ष असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असावी.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
  • उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालील प्रमाणे असेल.

अ.क्र. शैक्षणिक अर्हता प्रतिमाह वि‌द्यावेतन रु.
1 १२ वी पास रु. 6,०००/-
2 आय.टी.आय/ पदविका रु. ৪,০০০/-
3 पदवीधर / पदव्युत्तर रु. १०,०००/-
Maza Ladka Bhau Yojana-संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उ‌द्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन – क्रमांक- 1800 120 8040 वर संपर्क साधावा. संलग्नक कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाव्दारे दि. 09.07.2024 रोजी जारी केलेल शासन निर्णय (संकीर्ण-2024/प्र.क्र.90/व्यशि-3)