मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठाना मिळणार ३००० रुपये, वयोश्री योजना आहे तरी काय ? जाणून घ्या A टू Z माहिती

मुख्यमंत्री वयोश्री योजना वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून ३०००रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात. यासाठी काय कागदपत्रे लागतात? पात्रता काय? कुठे अर्ज करायचा? सर्व A to Z माहिती वाचा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्धांना खालीलप्रमाणे उपकरणे प्रदान केली जातात:

ऐकण्याचे यंत्रे वॉकर, स्टिक, किंवा क्रचेस यांसारखी उपकरणे. व्हीलचेअर्स चष्मे सांधे आणि हाडांच्या समस्यांसाठी ब्रेसस किंवा सपोर्ट्स. व्यक्तीच्या गरजेनुसार विविध इतर सहाय्यक साधने.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता

वयोमर्यादा: 65 वर्ष पूर्ण असावे. उत्पन्न मर्यादा : अर्जदाराची उत्पन्न मर्यादा 2 लाखा पर्यंत आहे . निवास: अर्जदार महाराष्ट्र राज्यात रहिवासी असावा. स्वीकृत दस्तऐवज: अर्जदाराकडे ओळखपत्र, निवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड ओळखपत्र आय प्रमाण पत्र जात प्रमाणपत्र स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र समस्येचे प्रमाणपत्र बँक खाते पासबुक मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो