मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

योजने विषयी अधिक माहिती

महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनांच्या माध्यमातून राज्याची महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी  महिलांना प्रत्येक महिन्यात 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्याच्या पात्र महिलांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार माझी लाडकी बहिन योजनेसाठी Narishakti Doot App And Mukhya Mantri Ladki bahin संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

*वरील माहिती पात्रता व अपात्रतेच्या निकषांवर आधारित आहे.*

आधार कार्ड:

अर्ज करताना आधार कार्डानुसारच नाव नमूद करणे आवश्यक आहे.

अधिवास प्रमाणपत्र:

जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाईल:

  • 15 वर्षांपूर्वीचा रेशन कार्ड.
  • 15 वर्षांपूर्वीचा मतदार ओळखपत्र.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • शाळा सोडल्याचा दाखला.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास:

पतीचे खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे:

  • 15 वर्षांपूर्वीचा रेशन कार्ड.
  • 15 वर्षांपूर्वीचा मतदार ओळखपत्र.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • अधिवास प्रमाणपत्र.

वार्षिक उत्पन्न:

वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास: उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही.

ब) शुभ्र शिधापत्रिका किंवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास: वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

नवविवाहितेच्या बाबतीत:

जर रेशन कार्डावर तिच्या नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.

बँक खाते तपशील:

खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.

लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो:

अर्जासोबत हमीपत्र व पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे अनिवार्य आहे.

अर्जामध्ये काय-काय विचारलंय?

  • महिलेचे संपूर्ण नाव (आधार कार्ड प्रमाणे)
  • पतीचे / वडिलांचे नाव
  • जन्म दिनांक: (दिनांक/ महिना/ वर्ष)
  • अर्जदाराचा संपूर्ण पत्ता
  • जन्माचे ठिकाण
  • जिल्हा
  • गाव/वाहर
  • ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका
  • पिनकोड
  • मोबाईल क्रमांक
  • आधार क्रमांक
  • शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? (होय/नाही)
    असल्यास, दरमहा रु. ______
  • वैवाहिक स्थिती
  • महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
  • महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का?
  • अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बैंकेचे तपशील:
    • बँकेचे पूर्ण नाव
    • बँक खाते धारकाचे नाव
    • बँक खाते क्रमांक
    • IFSC कोड
  • आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? (होय/नाही)
  • सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी:
    • आधार कार्ड
    • अधिवास/जन्म प्रमाणपत्र
    • उत्पन्न प्रमाणपत्र
    • अर्जदाराने हमीपत्र
    • बँक पासबुक
    • अर्जदाराचा फोटो

अर्ज कोणाकडे जमा करावा?

  • ऑनलाईन भरलेला अर्ज पुढील Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार यांच्याकडे जमा करावा:
    • अंगणवाडी सेविका
    • अंगणवाडी मदतनीस
    • पर्यवेधिका
    • ग्रामसेवक
    • वार्ड अधिकारी

हि सरकारी वेबसाईट नसून केवळ लोकांना सरकारी योजने विषयी अधिक माहिती मिळावी व लोकांना योजना फायदा मिळावा या हेतू हि वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.