मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजने विषयी अधिक माहिती
ℹ️ ही एक खाजगी माहितीपर वेबसाइट आहे. आम्ही कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. अर्ज व अधिकृत माहितीसाठी संबंधित शासकीय पोर्टलला भेट द्या.
लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत DBT द्वारे दिली जाते. यासाठी Nari Shakti Doot App आणि अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. — पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती मराठीत.
टीप: वरील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे — प्रत्यक्ष अर्ज अधिकृत शासकीय पोर्टलवरूनच करावा.
योजनेबद्दल•
राज्यातील महिला व मुलींच्या आरोग्य, पोषण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. याच अनुषंगाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत डीबीटीद्वारे दिली जाते.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यातील मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये पोषणाची कमतरता आढळून येते, त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व आरोग्य सुधारणा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आणि वाचा →दरमहा सहाय्य रक्कम
शासन निर्णयानुसार
वयोमर्यादा
21 ते 65 वर्षे
आवश्यक कागदपत्रे
7 मुख्य बाबी
स्त्रोत: संबंधित शासन निर्णय (GR) | माहिती अद्ययावत केल्याचा दिनांक: [येथे तारीख टाका]
1आधार कार्ड▾
2अधिवास प्रमाणपत्र▾
- १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड
- १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
3परराज्यातील जन्म असल्यास▾
- १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड
- १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
4वार्षिक उत्पन्न — ₹2.50 लाखांपेक्षा कमी▾
- अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास, वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
5नवविवाहितेच्या बाबतीत▾
6बँक खाते तपशील▾
7हमीपत्र व फोटो▾
योजनेचे उद्दिष्ट•
महिलांचे आर्थिक स्वावलंबन
आरोग्य व पोषण स्तरात सुधारणा
कुटुंबातील निर्णयांत भूमिका बळकट
अर्ज प्रक्रिया•
अंगणवाडी / ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज उपलब्ध
पोर्टल/अॅपवर अर्जाची नोंदणी केली जाते
नोंदणी दरम्यान महिलेचा फोटो घेतला जातो
अर्ज क्रमांक पावतीवर देऊन अर्जदारास दिला जातो
e-KYC कशी करावी?•
अधिकृत पोर्टलला भेट द्या व "eKYC" पर्यायावर क्लिक करा
12 अंकी आधार क्रमांक व कॅप्चा टाका, "Send OTP" दाबा
आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा
"eKYC Successful" संदेश आल्यावर प्रक्रिया पूर्ण
अस्वीकरण: या वेबसाइटवरील माहिती केवळ सामान्य जनजागृती व मार्गदर्शनासाठी आहे. आम्ही कोणतेही शासकीय खाते, विभाग किंवा अधिकृत पोर्टल नाही. योजनेतील अद्ययावत अटी, पात्रता व अर्ज प्रक्रियेसाठी नेहमी संबंधित अधिकृत शासकीय वेबसाइट तपासा.
अर्जामध्ये काय-काय विचारलंय?
- महिलेचे संपूर्ण नाव (आधार कार्ड प्रमाणे)
- पतीचे / वडिलांचे नाव
- जन्म दिनांक: (दिनांक/ महिना/ वर्ष)
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता
- जन्माचे ठिकाण
- जिल्हा
- गाव/वाहर
- ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका
- पिनकोड
- मोबाईल क्रमांक
- आधार क्रमांक
-
शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? (होय/नाही)
असल्यास, दरमहा रु. ______ - वैवाहिक स्थिती
- महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
- महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का?
-
अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बैंकेचे तपशील:
- बँकेचे पूर्ण नाव
- बँक खाते धारकाचे नाव
- बँक खाते क्रमांक
- IFSC कोड
- आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? (होय/नाही)
-
सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी:
- आधार कार्ड
- अधिवास/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
अर्ज कोणाकडे जमा करावा?
-
ऑनलाईन भरलेला अर्ज पुढील Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार यांच्याकडे जमा करावा:
- अंगणवाडी सेविका
- अंगणवाडी मदतनीस
- पर्यवेधिका
- ग्रामसेवक
- वार्ड अधिकारी
हि सरकारी वेबसाईट नसून केवळ लोकांना सरकारी योजने विषयी अधिक माहिती मिळावी व लोकांना योजना फायदा मिळावा या हेतू हि वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.