नमो शेतकरी महासम्मान निधी योजना 2024-25
महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासम्मान निधी योजना पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. योजनेतून वर्षाला ₹6,000 (तीन हप्त्यांमध्ये) मिळतील. जर तुम्ही PM Kisan लाभार्थी असाल, तर तुम्हाला केंद्र शासनाकडून सुद्धा ₹6,000 मिळतील, म्हणजे एकूण ₹12,000 वार्षिक लाभ. जर का तुम्ही प्रधान मंत्री पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील. प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
हप्त्यांसह वार्षिक लाभ
हप्ता | तारीख | नमो शेतकरी (₹) | PM Kisan (₹) | एकूण (₹) |
---|---|---|---|---|
1 | 5 ऑक्टोबर 2024 | 2,000 | 2,000 | 4,000 |
2 | 5 नोव्हेंबर 2024 | 2,000 | 2,000 | 4,000 |
3 | 5 डिसेंबर 2024 | 2,000 | 2,000 | 4,000 |
लाभार्थी स्टेटस पाहा
Namo Shetkari Yojana Status List पाहण्यासाठी दोन पर्याय आहेत:
- मोबाइल नंबर
- रेजिस्ट्रेशन नंबर
उदाहरणार्थ, रेजिस्ट्रेशन नंबर निवडून Captcha भरून Get Data बटन क्लिक करा. स्क्रीनवर Fund Disbursed Details दिसेल.
लाभार्थी स्टेटस पहानमो शेतकरी योजना रेजिस्ट्रेशन
या योजनेसाठी स्वतंत्र रेजिस्ट्रेशन आवश्यक नाही. ज्या शेतकऱ्यांना PM Kisan चे अनुदान मिळते, त्यांना आपोआप लाभ मिळेल. जर अर्ज केला नसेल, तर लवकर अर्ज करा.
इतर संबंधित योजना
- सौर कृषी पंप योजना: शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान
- माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्र शासनाची महिला सक्षमीकरण योजना – लाभ ₹1,500
- PM Vishwakarma Yojana: शिल्पकला व कौशल्य विकासासाठी केंद्रीय योजना
निष्कर्ष
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. PM Kisan सह मिळून शेतकऱ्यांना वार्षिक ₹12,000 लाभ मिळतो, ज्यामुळे आर्थिक सुरक्षा व जीवनमान सुधारता येते.
शेअर करणं हीच खरी मदत – चला ही योजना सर्वांपर्यंत पोहोचवूया!
तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य उजळू शकतं – गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवा.