महाराष्ट्र RTE 25% प्रवेश 2026-27
वय कॅल्क्युलेटर, पात्रता मार्गदर्शक आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया
🧮 RTE वय पात्रता कॅल्क्युलेटर 2026-27
🎯 RTE 2026-27 साठी महत्त्वाच्या सूचना
पालकांकरीता 15 महत्त्वाच्या सूचना – काळजीपूर्वक वाचा
📋 पालकांकरीता 15 सूचना (2026-2027)
✅ पात्रता निकष (Eligibility Criteria)
📅 वयोमर्यादा (Age Limit)
| वर्ग (Standard) | किमान वय (31 डिसेंबर 2026 रोजी) | जन्म वर्ष | पात्रता |
|---|---|---|---|
| 1st Standard | 6+ वर्षे | 2019 किंवा त्यापूर्वी | ✓ पात्र |
| Senior KG | 5+ वर्षे | 2020 किंवा त्यापूर्वी | ✓ पात्र |
| Junior KG | 4+ वर्षे | 2021 किंवा त्यापूर्वी | ✓ पात्र |
| Nursery/Pre-KG | 3+ वर्षे | 2022 किंवा त्यापूर्वी | ✓ पात्र |
| Playgroup | 2+ वर्षे | 2023 किंवा त्यापूर्वी | ✓ पात्र |
• 2020 जन्म पात्र: Senior KG, Junior KG, 1st Standard (काही अटींसह)
• 2021 जन्म पात्र: Junior KG
• 2022 जन्म पात्र: Nursery/Pre-KG
💰 उत्पन्न मर्यादा (Income Limit)
| प्रवर्ग (Category) | उत्पन्न मर्यादा | आवश्यक कागदपत्र |
|---|---|---|
| EWS (सामान्य) | ₹1,00,000 पेक्षा कमी (वार्षिक) | उत्पन्न दाखला |
| SC/ST | मर्यादा नाही | जातीचा दाखला |
| OBC/VJNT/SBC | Non-Creamy Layer आवश्यक | Non-Creamy Layer प्रमाणपत्र |
| दिव्यांग (Divyang) | 40%+ अपंगत्व प्रमाणपत्र | वैद्यकीय प्रमाणपत्र |
📄 आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
• फक्त राष्ट्रीयकृत बँक पासबुक – खाजगी बँक पासबुक मान्य नाही
• Google Map Latitude/Longitude – अनिवार्य
जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत किंवा संबंधित प्राधिकरणाकडून जारी केलेले अधिकृत जन्म प्रमाणपत्र. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही!
आधार कार्ड (Aadhaar Card)
मुलाचे आणि पालकांचे आधार कार्ड आवश्यक. आधार कार्ड रहिवासी पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.
रहिवासी दाखला (Residential Proof)
रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल, राष्ट्रीयकृत बँक पासबुक. गॅस बिल 2026-27 साठी रद्द – मान्य नाही!
उत्पन्न दाखला (Income Certificate)
EWS प्रवर्गासाठी वार्षिक उत्पन्न ₹1 लाखापेक्षा कमी असल्याचा दाखला. किंवा BPL रेशन कार्ड.
जातीचा दाखला (Caste Certificate)
SC/ST/OBC/VJNT/SBC प्रवर्गासाठी वैध जातीचा दाखला. OBC साठी Non-Creamy Layer आवश्यक.
अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate)
दिव्यांग बालकांसाठी 40% किंवा अधिक अपंगत्व असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
Google Map Location (Latitude & Longitude)
अनिवार्य: Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Lattitude, Longitude प्रवेश अर्जावर टाकावे. Location चुकू नये म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पासपोर्ट साइझ फोटो
मुलाचे अलीकडील पासपोर्ट साइझ फोटो (डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यासाठी).
📝 अर्ज प्रक्रिया (Application Process)
⏰ अंतिम मुदत: 28 फेब्रुवारी 2026
RTE 25% प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
| प्रक्रिया | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू | सुरू झालेले आहे |
| अर्ज भरण्याची अंतिम मुदत | 28 फेब्रुवारी 2026 |
| लॉटरी ड्रॉ | लवकरच जाहीर होईल |
| प्रवेश प्रक्रिया | लॉटरी निकालानंतर |
💻 ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइटवर जा
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या अधिकृत वेबसाइटवर जा आणि “RTE 25% Admission” लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी (New Registration)
“Online Application” मेनूमधून “New Registrations” निवडा. मुलाची माहिती आणि पालकांचा मोबाईल नंबर टाका.
माहिती भरा
सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा. जन्मतारखा जन्म प्रमाणपत्रानुसार टाका (नंतर बदलता येणार नाही).
Google Map Location टाका
अनिवार्य: Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Lattitude, Longitude अचूकपणे टाकावे. Location चुकू नये म्हणून पुन्हा पुन्हा तपासा.
कागदपत्रे अपलोड करा
सर्व कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात स्कॅन करून अपलोड करा. गॅस बुक अपलोड करू नये – फक्त राष्ट्रीयकृत बँक पासबुक.
शाळा निवडा
फक्त 1 किमी परिसरातील शाळा निवडता येतील (कमाल 10 शाळा).
अर्ज तपासा आणि सबमिट करा
सर्व माहिती पुन्हा पुन्हा तपासून पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय सबमिट करू नये.
अर्जाची प्रत जपून ठेवा
अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
⚠️ महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)
- अचूक माहिती: अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असावी. चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द होईल.
- कागदपत्रे: सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे नसल्यास निवड नंतरही प्रवेश रद्द होऊ शकतो.
- जन्मतारखा: जन्म प्रमाणपत्रानुसार जन्मतारखा टाका. ही माहिती नंतर बदलता येणार नाही.
- पत्ता: Google Maps वर पत्ता निश्चित करा आणि Latitude-Longitude नोंदवा.
- दुपटी अर्ज: एकाच मुलासाठी एकच अर्ज करा. दुपटी अर्ज बाद होतील.
- 1 KM नियम: फक्त 1 किमी अंतरापर्यंतच्या शाळाच निवडता येतील.
- गॅस बुक रद्द: निवासी पुरावा म्हणून गॅस बुक मान्य नाही.
- बँक पासबुक: फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य.
📞 संपर्क माहिती (Contact Information)
डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे – 411001
दूरध्वनी: 020-26125692
ई-मेल: rtemah2020@gmail.com / educom-mah@mah.gov.in
अधिकृत वेबसाइट: student.maharashtra.gov.in