Ladka Bhau Yojana दर महिन्याला 10 हजार मिळणार!लाडक्या भावांनो, कसा कराल अर्ज, योजनेच्या अटी काय?
Maza Ladka Bhau Yojana- महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेद्वारे आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांना आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करेल. सरकारतर्फे देण्यात येणारे हे प्रशिक्षण युवकांना मोफत दिले जाणार आहे. याशिवाय तरुणांना महिन्याला १०,००० रुपयांपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे.
💁♂️ योजनेचे नाव : लाडका भाऊ योजना Ladka Bhau Yojana
🗃️ योजनेची उद्दिष्टे :
- युवकांना रोजगारक्षम बनवणे: या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील युवकांना उद्योगधंद्याच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे. यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होईल.
- बेरोजगारी कमी करणे: महाराष्ट्रात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे. लाडका भाऊ योजना ही समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल आहे. या योजनेद्वारे युवकांना रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
- उद्योगधंद्याला प्रोत्साहन: या योजनेद्वारे कुशल कामगारांची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे राज्यात उद्योगधंद्याला चालना मिळेल.
- सामाजिक-आर्थिक विकास: रोजगार मिळाल्याने युवकांचे आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारेल. यामुळे राज्याचा सामाजिक-आर्थिक विकास होईल.
- स्वयंरोजगाराचे प्रोत्साहन: या योजनेतून स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे युवक स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतील आणि स्वतःचे मालक बनू शकतील.
- ग्रामीण विकास: ग्रामीण भागातील युवकांनाही या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल.
💁♂️ योजनेची पात्रता :
- योजनेकरिता उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे.
- शैक्षणिक पात्रता 12 वी पास, आयटीआय,पदविका,पदवी, पदव्युत्तर असावी.
- पुढील उच्च शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेत पात्र असणार नाहीत.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
💁♂️ योजनेचा लाभ:
- योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये.
- आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना 8 हजार तर पदवीधर.
- पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने येणार आहे.
💸 आवश्यक कागदपत्रे:
१) लाभार्थीचा जन्माचा पुरावा (जन्म दाखला किंवा १० वी प्रमाणपत्र)
२) लाभार्थीचे आधार कार्ड
३) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
४ ) शेक्षणिक पुरावे 12 वी पास, आयटीआय,पदविका,पदवी, पदव्युत्तर
५) महाराष्ट्र रहिवाशी पुरावा.
🌐 अर्ज प्रक्रिया:
- रोजगार महास्वयं पोर्टलवर जा: https://rojgar.mahaswayam.gov.in
- होम पेजवर “नवीन नोंदणी” बटणावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यानंतर, तुमच्या प्रोफाइलमध्ये आवश्यक माहिती भरून अपडेट करा.
- शैक्षणिक पात्रता: यात तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्ये, इत्यादीचा समावेश आहे.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना :पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध योजनांची यादी शोधा.
- “Job/CMYKPY Training Search” या वर क्लिक करा.
- पात्रता तपासा:योजनेची पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
- तुमची पात्रता सुनिश्चित करा.
💁♂️ ऑनलाईन अर्ज करा: (Ladka Bahu Yojana ) Apply Now
Ladka bahu Yojana
GR Download
#लाडकाभाऊयोजना #महाराष्ट्रसरकार #मुख्यमंत्रीयुवाकार्यप्रशिक्षणयोजना