Ramai Awas Yojana:रमाई आवास योजनेतून मिळवा हक्काचे घर

Table of Contents

मागासवर्गीय कुटुंबांसाठी पक्क्या घराचे स्वप्न होणार साकार!

रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती नवबौध्द कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्याचे निवाऱ्याचा प्रशन सुटावा म्हणून ग्रामिण व शहरी भागामध्ये त्याच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना सन 2009-10 पासून सुरु आहे.  सदर योजनेची अमलबाजवणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा शहरी विभागासाठी नगर परिषद / नगर पालिका / महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा मार्फत करण्यात येते.


योजनेचे नाव:

रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana)


योजनेची उद्दिष्टे:

१. मागासवर्गीय कुटुंबांना हक्काचे पक्के घरे उपलब्ध करून देणे.
२. महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांना मदत करणे.
३. ग्रामीण आणि शहरी भागांतील बेघर कुटुंबांसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
४. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गृहनिर्माण सुविधा उपलब्ध करून देणे.

ramai awas yojana
ramai awas yojana

योजनेची पात्रता:

१) लाभार्थ्याचे महाराष्ट् राज्याचे 15 वर्षाचे वास्तव असणे आवश्यक आहे
२) लाभार्थ्यांने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा
३) एक कुटुंबातील एकाच व्यक्ती लाभ देण्यात येईल.
४) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१.५ लाखांपेक्षा कमी असावे.


योजनेचा लाभ:

  1. घराच्या बांधकामासाठी क्षेत्र निहाय कलाम खार्चाची मर्यादा 132000/- व नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी 142000/- व नगर परिषद / नगर पालिका व महानगर पालिका व  मुंबई विकास प्राधिकारण क्षेत्र यांच्या साठी रु. 2.50 लक्ष इतके आहे.
  2. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होईल.
  3.  ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत कामाच्या स्वरूपात अतिरिक्त आर्थिक सहाय्य.
  4. शहरी विभागात दारिद्रय रेषे वरील पात्र लाभार्थ्यांना सुध्दा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
  5. लाभार्थी हिस्सा ग्रामिण क्षेत्रा निरंक, नगर पालिका क्षेत्र 7.5 टक्के , महानगर पालिका क्षेत्र 10 टक्के इतका आवश्यक. 
  6. ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 30.12.2015 अन्वये पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य्‍ योजना सुरु करण्यात आली असून सदर योजने अंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामिण क्षेत्रातील द्रारिद्रय रेषेखालील  घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतू जागा उलब्धत नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करिता रु. 50000/- पर्यंत अर्थसहाय्य देण्यता येते .
  7. अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत, ज्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे व वार्षीक उत्पन्न 1 लाखा पर्यंत आहे अशा अपंग लाभार्थ्यांना, ते योजनेच्या उर्वरीत अटी व शर्तीची पूर्तता करित असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. १) अर्जदाराचा जातीचा दाखला.
  2. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र).
  3. आधार कार्ड.
  4. बँक खाते तपशील (पासबुकची छायांकित प्रत).
  5. मतदार ओळखपत्र किंवा इतर ओळख दस्तावेज.
  6. रेशनकार्ड.
  7. बेघर असल्याचा किंवा खराब घरात राहण्याचा पुरावा.
ramai check list
ramai check list

अर्ज कसा करावा:

१) अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका कार्यालय, किंवा जिल्हा गृहनिर्माण विभागात सादर करता येईल.
२) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी.
३) अर्जाची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल.
४) अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.


 

निष्कर्ष:

रमाई आवास योजना (Ramai Awas Yojana) हे गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांचे हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न साकार करण्याचे पाऊल आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाने राहण्यासाठी पक्की घरे दिली आहेत.
तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या कुटुंबासाठी उज्ज्वल भविष्याचा पाया घालून द्या.

#रमाईआवासयोजना #महाराष्ट्रसरकार #घरसबकेलिए #ramaiawasyojana

Leave a Comment