बांधकाम कामगार योजना
Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकार विविध योजना योजनेअंतर्गत 2000 पासून ते 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेअंतर्गत सुमारे १५ लाख बांधकाम कामगारांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी (Maharashtra Building and Other Construction Worker’s Welfare Board) महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टल अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. तर या योजना खालील प्रमाणे.
सामाजिक सुरक्षा योजना
1.पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु. ३०,०००/-
या योजने अंतर्गत सरकार बांधकाम कामगारास त्याच्या पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी ३०,००० रू. देते.त्यासाठी लागणारी कागदपत्रे.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
- प्रथम विवाह असल्याबाबत शपतपत्र (Affidavit)
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र.
- बँकेचे पासबुक.
- रहिवासी पुरावा (आधारकार्ड/पारपत्र/वाहनचालक परवाना/शिधापत्रिका/मागील महिन्याचे विद्युत देयक/ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी एक)
अर्ज PDF डाउनलोड करा
सदर अर्ज ऑनलाईन अर्ज भरून ऑनलाईन अपॉयमेन्ट लेटर सहित ज्या दिवशी अपॉयमेन्टअसेल त्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रासहित जिल्हा कामगार कार्यलयात हजार राहणे.
2.बांधकाम कामगारांना भोजन योजना
Bandhkam Kamgar या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना त्याच्या कामाच्या ठिकाणी दुपारचे जेवण पुरवले जाते त्यासाठी बांधकाम कामगारांनी आपल्या जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयास अर्ज करणे आवश्यक असते. एकदा विहित विहित नमुन्यात अर्ज सदर केल्यावर नंतर कामगारांना जेवण पुरवले जाते जो पर्यंत काम चालू आहे.
अर्ज PDF डाउनलोड करा
शैक्षणिक योजना
या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.
इयत्ता १ ते ७ च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. २५००/-
आवश्यक कागदपत्रे :
- Certificate of 75% attendance in previous academic year मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड
- Ration Card / शिधापत्रिका
इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- Certificate of 75% attendance in previous academic year मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड
- Ration Card / शिधापत्रिका
इयत्ता १० व १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका.
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
इयत्ता ११ व १२ च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- College Identity Card / महाविद्यालयचे ओळखपत्र (optional)
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. २०,०००/-
(नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )
आवश्यक कागदपत्रे :
- College Identity Card / महाविद्यालयचे ओळखपत्र (optional)
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक.
वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १,००,०००/-
अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु. ६०,०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- College Identity Card / महाविद्यालयचे ओळखपत्र (optional)
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक
शासनमान्य पदविकेसाठी (Diploma) प्रति शैक्षणिकवर्षी रु. २०,०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- College Identity Card / महाविद्यालयचे ओळखपत्र (optional)
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी (PG Diploma) प्रति शैक्षणिकवर्षी रु. २५,०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- College Identity Card / महाविद्यालयचे ओळखपत्र (optional)
- Bonafide certificate of current academic year/चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
- Child’s Aadhaar Card/ पाल्याचे आधार कार्ड.
- Ration Card / शिधापत्रिका.
- मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS -CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
- MS-CIT ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुक्लाची पावती.
बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता
नोंदणी पात्रता निकष
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
नोंदणी फी- रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू.1/-
कोणते प्रकारचे बांधकाम कामगार या योजनेस पात्र आहेत
- इमारती,
- रास्ता,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स,
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
वरील सर्व योजनेचं लाभ घेण्यासाठी पाहिले दिलेल्या लिंकवरून Online Apply करू शकता