लाडकी बहीण योजना: जुलै महिन्याचा हप्ता न मिळण्याची 8 प्रमुख कारणं
Ladki Bahin Yojana Jully Installment Not Received? जाणून घ्या का तुमच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता जमा झाला नाही.
✅ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा १३वा हप्ता जाहीर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० सरकारी मदत दिली जाते. जुलै महिन्याचा १वा हप्ता राज्य शासनाने जाहीर केला असून, २.५ कोटींहून अधिक महिलांना हा हप्ता मिळत आहे. मात्र काही महिलांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नाही.
❓ हप्ता न मिळण्यामागची ८ प्रमुख कारणं
जर तुमच्या खात्यात अजूनही हप्ता जमा झालेला नसेल, तर खालीलपैकी कोणते कारण लागू होऊ शकते:
- बँक खाते आधारशी लिंक नसणे: जर तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केलेले नसेल, तर DBT (Direct Benefit Transfer) होऊ शकत नाही. कृपया खात्री करा की खाते आणि आधार जोडलेले आहे.
- कौटुंबिक उत्पन्न जास्त: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त असल्यास योजना लागू होत नाही.
- कुटुंबातील कोणीही आयकरदाता: जर घरातील सदस्य आयकर भरत असेल तर लाभ मिळत नाही.
- सरकारी नोकरीत सदस्य: केंद्र/राज्य/उपमंडळ कर्मचारी असल्यास लाभ मिळत नाही.
- इतर योजनांतून ₹१५०० पेक्षा जास्त मानधन: दुहेरी लाभ टाळण्यासाठी नियम लागू आहे.
- घरात आमदार/खासदार: सध्याचे किंवा माजी आमदार/खासदार असल्यास लाभ मिळत नाही.
- बोर्ड/कॉर्पोरेशन सदस्य: सदस्य असल्यास योजना लागू होत नाही.
- चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता): कुटुंबाच्या नावावर कार/जीप असल्यास लाभ दिला जात नाही.
📝 पुढील काय करावे?
- तुमच्या पात्रतेची पुनःपडताळणी करा.
- वरील पैकी कोणताही अडथळा नसेल तर महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधा.
- 🔗 अधिकृत वेबसाइटला भेट द्या