वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ | वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु.१०.०० लाखा पर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबिवण्यात येते.

अर्जदाराची अर्हता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
  • लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ५० दरम्यान असावे
  • अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक स्टेटमेंट
  • प्रकल्प अहवाल

गट कर्ज व्याज परतावा योजना

अर्जदाराची अर्हता:

  • गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत.
  • गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील
  • गटातील लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ४५ दरम्यान असावे

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

  • शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक स्टेटमेंट
  • प्रकल्प अहवाल
 

Leave a Comment