EV Rickshaw Yojana : महिलांसाठी EV रिक्षा योजना – 80 हजार रु.ची सबसिडी मिळवा!

Table of Contents

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मुंबई ब्ल्यू (निळी) EV ऑटो रिक्षा स्किम महिलांसाठी

EV Rickshaw Yojana:महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या निळी EV ऑटो रिक्षा योजनेअंतर्गत महिलांसाठी एक अद्भुत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेद्वारे महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत, प्रशिक्षण, कर्ज आणि वाहन उपलब्ध करून दिले जातील.

अंमलबजावणी संस्थेचे:

GREEN SAVE EVOLUTION PVT. LTD.ही कंपनी या योजनेच्या अंमलबजावणीचे सर्व काम करणार आहे.हि योजना फक्त पुणे शहर विभागासाठी ट्रायल बेस वर चालू आहे नंतर सर्व जिल्ह्यांसाठी चालू होईल याची नोंद घ्यावी. 

 

घटक माहिती
योजनेचे उद्दिष्टे महिलांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, EV रिक्षा व्यवसायाद्वारे रोजगार निर्मिती.
अनुदान रक्कम ₹80,000 (₹50,000 + ₹30,000) महामंडळाकडून उपलब्ध.
कर्ज रक्कम 75% कर्ज बँक कडून, 5% लाभार्थ्यांचे भांडवल.
कर्ज परतफेड कालावधी 5 वर्षे.
व्याज दर अंदाजे 10%.
अर्जास पात्रता अनुसूचित जाती/नवच्यद्ध संवर्गातील महिलांसाठी. वय 18-50 वर्ष. 10 वी पास. वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत.
अर्जास आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, बँक पासबुक.
अंमलबजावणी संस्था GREEN SAVE EVOLUTION PVT. LTD. – प्रशिक्षण, वाहन परवाना व रिक्षा उपलब्ध करून देणे.

योजनेचे उद्दिष्टे:

  1. महिलांना स्वयंपूर्ण बनविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.
  2. EV रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे.
  3. सामाजिक समावेश व महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे.
  4. प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर प्रोत्साहन देणे.

योजनेची पात्रता: 

हि योजना फक्त पुणे शहर विभागासाठी चालू आहे

  1. अर्जदार अनुसूचित जाती/नवच्यद्ध संवर्गातील असावा.
  2. वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावा.
  3. अर्जदाराने 10 वी पास असावा.
  4. योजनेकरिता वार्षिक उत्पन्न शहरी क्षेत्रात 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  5. अर्जदार थकबाकीदार नसावा.

योजनेचा लाभ:

  1. EV रिक्षा व्यवसायासाठी 75% कर्ज बँक कडून उपलब्ध.
  2. 5% कुटुंबीय भाग भांडवल.
  3. एकूण अनुदान: ₹80,000 (₹50,000 + ₹30,000).
  4. कर्ज परतफेड कालावधी: 5 वर्ष.
  5. व्याज दर: अंदाजे 10%.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे:

  1. जातीचा दाखला.
  2. उत्पन्नाचा सक्षम अधिकारी दिलेला दाखला.
  3. पासपोर्ट आकाराचे फोटो.
  4. रेशनकार्ड.
  5. मतदार ओळखपत्र.
  6. आधार कार्ड.
  7. कोटेशन.
  8. वाहन परवाना.
  9. आधार लिंक असलेला बँक खाती क्रमांक व पासबुक.

अर्ज कसा करावा?
अर्ज आणि माहिती संबंधित कार्यालय किंवा GREEN SAVE EVOLUTION PVT. LTD. या कंपनीच्या अधिकृत कार्यालयात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित प्राधिकृत संस्था संपर्क साधा.

कामाची प्रकिया:

  1. वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणि ड्रायव्हिंग लायसन मिळवून देणे.
  2. परमिट व कागदपत्रे उपलब्ध करून देणे.
  3. महामंडळाच्या व बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता व अनुदान मिळवणे.
  4. वाहन (EV रिक्षा) उपलब्ध करून देणे.

संपर्क: 9881719229 (GREEN SAVE EVOLUTION PVT. LTD.)

#महात्माफुलेमहामंडळ #EVरिक्षास्किम #महिलांसाठी #निळीEV #रिक्षाबिझनेस #स्वयंपूर्णमहिला #महिलाअधिकार #GREENSAVE

Leave a Comment