Bandhkam Kamgar Yojana : २,५००/- रु पासून ते १ लाख पर्यंत शैक्षणिक अर्थसहाय्य

Bandhkam Kamgar Yojana पहिल्या दोन पाल्याना  मिळणार २,५०० रु पासून ते १ लाख शैक्षणिक अर्थसहाय्य

Bandhkam Kamgar Yojan: महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब बांधकाम कामगारांना महाराष्ट्र सरकार विविध योजना योजनेअंतर्गत  पहिल्या दोन पाल्याना 2500 पासून ते 1 लाखापर्यंत शैक्षणिक अर्थसहाय्य  प्रदान करते. या योजनेअंतर्गत सुमारे १५ लाख बांधकाम कामगारांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी (Maharashtra Building and Other Construction Worker’s Welfare Board) महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ नावाचे पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टल अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. तर या योजना खालील प्रमाणे.

💁‍♂️ योजनेचे नाव : बांधकाम कामगार शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

🗃️ योजनेची उद्दिष्टे  :

  • शिक्षणासाठी समान संधी: या योजनेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आर्थिक मदत करून शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणे.
  • सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणा: बांधकाम कामगारांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. या योजनेद्वारे मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन देऊन पुढील पिढीची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते.
  • कौशल्य विकास: शिक्षणाद्वारे मुलांमध्ये विविध कौशल्ये विकसित होतात. या योजनेद्वारे मुलांना चांगले शिक्षण मिळून त्यांच्यामध्ये रोजगारक्षम कौशल्ये विकसित होतील आणि ते भविष्यात चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतील.
  • गरीबी उन्मूलन: शिक्षण हा गरीबी उन्मूलनाचा एक प्रभावी मार्ग आहे. या योजनेद्वारे बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली जाऊ शकते.
  • समाजातील समता: या योजनेद्वारे शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देऊन समाजात समता आणण्याचा प्रयत्न केला जातो.

💁‍♂️ योजनेची पात्रता :

  • कामगारांची नोंदणी: लाभार्थी असलेल्या मुलाचा पालक/पालक/अभिभावक बांधकाम कामगार म्हणून संबंधित मंडळात नोंदणीकृत असला पाहिजे.
  • पहिल्या दोन मुलांसाठी: या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

💁‍♂️ योजनेचा लाभ:

  • इयत्ता १ ते ७ च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. २५००/-
  • इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/-
  • इयत्ता १० व १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/-
    आवश्यक पात्रता
  • इयत्ता ११ व १२ च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/-
  • पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. २०,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )
  • अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु. ६०,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )
  • वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १,००,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )

💸 आवश्यक कागदपत्रे:

इयत्ता १ ते १० च्या विद्यार्त्यांसाठी :

  1. आधार कार्ड 
  2. रेशन कार्ड 
  3. चालू वर्षाचे बोनाफाईड
  4. 75% हजारी प्रमाणपत्र 
  5. पालकाचे बँक पासबुक.

इयत्ता १० व १२ वी मध्ये किमान ५०% विद्यार्त्यांसाठी:

  1. आधार कार्ड 
  2. रेशन कार्ड 
  3. चालू वर्षाचे बोनाफाईड
  4. ५०% गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका.
  5. पालकाचे बँक पासबुक.

इयत्ता १० व १२ वी विद्यार्त्यांसाठी:

  1. आधार कार्ड 
  2. रेशन कार्ड 
  3. चालू वर्षाचे बोनाफाईड
  4. कॉलेज ओळखपत्र. (ID Card)
  5. पालकाचे बँक पासबुक.

अभियांत्रिकी व वैद्यकीय विद्यार्त्यांसाठी:

  1. आधार कार्ड 
  2. रेशन कार्ड 
  3. चालू वर्षाचे बोनाफाईड
  4. कॉलेज ओळखपत्र. (ID Card)
  5. पालकाचे बँक पासबुक.

🌐अर्ज करण्याची पद्धत:

बांधकाम कामगार शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज संबंधित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

 

Bandhkam kamgar Yojana

Apply Now

 

#बांधकामकामगारशिष्यवृत्ती #बांधकामकामगारकल्याणयोजना #शैक्षणिकअर्थसहाय्य #महाराष्ट्रशासन #केंद्रीयशासन #सरकारीयोजना #शिक्षणसहाय्य

Leave a Comment