Swadhar Yojana​ : स्वाधार योजना विद्यार्थांना मिळणार वर्षाला 51 हजार रुपयांची मदत.

Swadhar Yojana​ विद्यार्थांना मिळणार वर्षाला 51 हजार रुपयांची मदत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरित करते.

💁‍♂️ योजनेचे नाव : स्वधार योजना Swadhar Yojana

🗃️ योजनेची उद्दिष्टे  :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हि इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करणे करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यास शासनाने दिनांक 06 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयान्वाये मान्यता दिलेली आहे.

💁‍♂️ योजनेची पात्रता :

• विद्यार्थी अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा.
• विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा ( महानगरपालिका क्षेत्रातील )
• महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
• विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
• इयत्ता 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.
• इयत्ता 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50% (उतीर्ण) गुण असावे
• या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द) विद्यार्थ्यांना 3% आरक्षण असेल व गुणांची टक्केवारी 40% इतकी असेल

💁‍♂️ योजनेचा लाभ:

  • अनु.जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना रु. 51000/- हजार दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.
  • भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजा करुन या व्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना रु. 5000/- व इतर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रु. 2000/- शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात.

💸 आवश्यक कागदपत्रे:

  • जातीचा दाखला.
  • महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा (डोमेसाईल) (वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र रेशनकार्ड/निवडणुक ओळखपत्र/जन्म तारखेचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक)
  • आधार कार्डाची प्रत.
  • तहसिलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र.
  • दहावी/बारावी/पदवी परिक्षेचे गुणपत्रक.
  • महाविद्याल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट.
  • विद्यार्थी जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (भाडे करारनामा)
  • विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा.
  • पालकांचे हमीपत्र.
  • विद्यार्थ्यांचे हमीपत्र.

🌐अर्ज करण्याची पद्धत:

  • अधिकृत पोर्टलला hmas.mahait.org येथे भेट देऊन “स्वाधार योजना” निवडा व नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि संपूर्ण माहिती तपासून सबमिट करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी अर्जाची छाननी व तपासणी करतात.
  • तपासणी पूर्ण झाल्यानंतर, अर्ज मंजूर झाल्यास निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो.

 

Swadhar Yojana Apply Online

 

#स्वधारयोजना

#डॉबाबासाहेबआंबेडकरयोजना

#विद्यार्थीआर्थिकसहाय्य

#सामाजिकन्यायविभाग

#शिक्षणसहाय्य

#स्वाधारयोजना

#आर्थिकमदत

#महायोजना

#महाराष्ट्रशासन

#विद्यार्थीविकास

#शैक्षणिकयोजना

#अभ्यासक्रमसहाय्य

Leave a Comment