Ladki Bahin Yojana Latest News : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दरमहा २१०० रु. मिळणार
Ladki Bahin Yojana Latest News2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दरम्यान घोषणा केली की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेत सध्या दिल्या जाणाऱ्या 1500/- रुपये ऐवजी मानधन वाढवून प्रत्येक महिन्यात 2100/- असा आर्थिक लाभ DBT द्वारा जमा करण्यात येणार असल्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
💁♂️ योजनेचे नाव : माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana
🗃️ योजनेची उद्दिष्टे :
१. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. .
२. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
४. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
💁♂️ योजनेची पात्रता :
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे
💁♂️ योजनेचा लाभ:
- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
💸 आवश्यक कागदपत्रे:
१. आधार कार्ड (अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमूद करावे)
२. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे (१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) वापैकी कोणतेही एक.
४. वार्षिक उत्पन्न रु. २५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक, अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
4) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पत्र रु. २५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
५. नवविवाहितेच्या बाबतीत रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड है उत्पत्राचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.
६. बैंक खाते तपशील (खाते आधार लिंक असावे)
७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो
खुशखबर लाडक्या बहिणीला आता मिळणार 2100 रुपये | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta Update
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जन आशीर्वाद दरम्यान घोषणा केली की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेत सध्या दिल्या जाणाऱ्या पंधराशे रुपये ऐवजी मानधन वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणी योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात 2100 रुपये सरकार द्वारा जमा करण्यात येणार असल्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Ladki Bahin Yojana Installment Date.
एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा | Eknath Shinde News
१) राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती.
२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये.
३) प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
४) वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
६) राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार.
७) ४५ हजार पांदण रस्ते बांधणार.
८) अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन.
९) वीज बिलात ३० टक्के कपात.
१०) शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार.
Ladki Bahin Yojana
#लाडकीबहीणयोजना #महाराष्ट्रसरकार #मुख्यमंत्रीलाडकीबहीणयोजना #एकनाथशिंदे